वणी : नागपूर व वणी येथून मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना वणी पोलीस डीबी पथकाने अटक केली. चोरट्यांच्या ताब्यातून चोरी गेलेली 2 होंडा अक्टीव्हा मोपेड व 1 मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. सौरव भटवलकर (20) रा. सेवानगर वणी व सतीश मडावी (25) रा. राळेगाव असे अटकेतील चोरट्यांचे नाव आहे.
आरोपी सौरव भटवलकर याच्या ताब्यातून दि. 21 नोव्हे. रोजी वणी बस स्थानक येथून चोरी गेलेली होंडा अक्टीव्हा मोपेड क्र.MH 29 AY 2585 व हिरो होंडा स्पलेंडर मोटरसायकल क्र. MH 29 Z 5938 जप्त करण्यात आली. तर आरोपी सतीश मडावी कडून लकडगंज नागपूर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेलेली होंडा अक्टीव्हा मोपेड क्र. MH 31 DF 1266 जप्त करण्यात आली. नागपूर येथून चोरी गेलेली मोटरसायकल बाबत लकडगंज पोलिसांना माहिती देऊन आरोपी सतीश मडावी याला लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व ठाणेदार अजित जाधव यांचे मार्गदर्शनात एपीआय माधव शिंदे, स. फौ. सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम मो. वसीम, गजानन कुळमेथे यांनी केली.