• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 17, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

धक्कादायक : वणी शहरात सेक्स रॅकेटचा उघडपणे सुळसुळाट

• हॉटेल, लॉज, लेआऊटमध्ये बिनधास्त सुरु आहे देह व्यवसाय • व्हॉट्सॲप, मेसेंजर व इतर सोशल साईट्सच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क

Wani Times by Wani Times
June 29, 2025
in क्राईम, वणी, संपादकीय
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 4,147

वणी टाईम्स न्युज : शहरातील काही ठराविक हॉटेल्स व लॉजमध्ये दिवसाढवळ्या व रात्री बेरात्री खुलेआम देहव्यवसाय सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. स्थानिक पोलिसांना वेळोवेळी माहिती देऊनही या संदर्भात ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. या अवैध धंद्याला डिजिटल स्वरूप प्राप्त झाले असून, व्हॉट्सॲप, मेसेंजर यांसारख्या अॅप्सद्वारे ग्राहकांपर्यंत मुलींचे फोटो पोहोचवले जात आहेत.

ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे रॅकेटचं संचालन

या रॅकेटमध्ये काही ठराविक दलाल सक्रीय असून, ते मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून ग्राहकांशी थेट संपर्क साधतात. ग्राहकाच्या मागणीनुसार मुलींचे फोटो, दररोजचे “रेट” आणि “सेवा” याबाबत माहिती पाठवली जाते. व्यवहार निश्चित झाल्यावर ग्राहकाला विशिष्ट हॉटेल/लॉज मध्ये बोलावून मुलींची व्यवस्था केली जाते. विशेष म्हणजे, या हॉटेल्स आणि लॉज चालकांनाही या व्यवसायाबद्दल माहिती असून ग्राहकांचे ओळखपत्र न घेता ते परस्पर सहमतीने जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थीही अडकले

या रॅकेटमध्ये केवळ श्रीमंत, व्यावसायिक व नोकरदार शौकीनच नव्हे तर कॉलेज तसेच काही शाळकरी विद्यार्थीही अडकले आहेत. समाजमाध्यमांवरील वाढती आकर्षणं, हौशी जीवनशैली व फास्ट मनीची लालसा यामुळे तरुण पिढी या विळख्यात अडकत आहे. हे अत्यंत चिंताजनक असून अनेक पालकांनाही आपल्या मुलांचा सहभाग असल्याची कल्पनाच नाही.

बाहेरील राज्यांतून कॉलगर्लची मागणी

ग्राहकांच्या विशेष मागणीनुसार नागपूर, पुणे, मुंबई, तसेच छत्तीसगड, मध्यप्रदेशातील मुलींनाही येथे बोलावले जाते. काही केसेसमध्ये कॉलगर्लना रेल्वे स्थानक अथवा हायवेवरून उचलून थेट हॉटेलमध्ये नेण्याची यंत्रणा उभी करण्यात आली आहे. यामागे एक संगठित टोळी कार्यरत असून, तिचे अनेक गुन्हेगारी कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्रामीण भागातून आलेल्या व अल्पवयीन मुलींचा वापर

शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या अनेक गरीब व हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या मुलींना जाळ्यात अडकवून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकून, आर्थिक प्रलोभने दाखवून देह व्यवसायासाठी त्यांचा वापर केला जात असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. तसेच या व्यवसायात अल्पवयीन मुलींची मागणी जास्त असल्याने संबंधित दलाल बाहेर राज्यातून अल्पवयीन मुलीचा पुरवठा करत असल्याचेही सांगण्यात येते. यातूनच काही मुलींची आयुष्यभरासाठी मानसिक व सामाजिक हानी होत असल्याची उदाहरणंही आहेत. हे अत्यंत गंभीर असून मुलींच्या बालपणावर गदा आणणाऱ्या या प्रकरणात बाल संरक्षण आयोग, महिला आयोग, तसेच मानवाधिकार संस्था यांचा तातडीने हस्तक्षेप आवश्यक आहे.

कायद्याची आड घेऊन पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष ?

स्थानिक पोलिसांना याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या असून, सज्ञान (18 वर्षांवरील) मुलं मुली बाबत सुप्रीम कोर्टाचे दिशानिर्देश असल्याचा कारण पुढे करून सोयीस्कररित्या कारवाई टाळली जाते. काहीवेळा छापेही टाकण्यात आले. मात्र, सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याची कलम लावून त्यांना सोडण्यात आले.

संपादकीय मत:

शहरात सुरू असलेल्या या अवैध देहव्यवसायामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. युवापिढीची नैतिक अधोगती होत आहे आणि महिलांवर अत्याचाराचा धोका वाढतो आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सखोल चौकशी करून या रॅकेटमागील मास्टरमाइंडना अटक करणे आणि हॉटेल व लॉजवर कायमस्वरूपी नजर ठेवणे ही काळाची गरज आहे.

[वणी टाइम्स न्यूज – आपली खरी बातमी, शहराच्या हितासाठी]

तुमच्याजवळ अशा प्रकारच्या घटना असतील तर आमच्याशी संपर्क साधा. तुमची ओळख गुप्त ठेवण्यात येईल.

Tags: call girlLead storysex racketSP Yavatmalwani police
TweetSendShareShare
Previous Post

“डॉक्टर्स डे” के अवसर पर रक्तदान शिविर सहित विविध कार्यक्रमों का आयोजन

Next Post

मनसे पक्ष नेते मा. राजाभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Related Posts

ब्रेकिंग न्युज

‘बर्थडे’ से एक दिन पहले युवक की संदेहास्पद मौत

by Wani Times
May 16, 2026
0
वणी

दोषी महसूल अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी SDO ची ‘विशेष कृपा’ ?

by Wani Times
May 16, 2026
0
क्राईम

खोटे दस्तावेज तयार करून भूखंड विक्री; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांवर अखेर गुन्हा दाखल

by Wani Times
May 15, 2026
0
निधन

दुखद : सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संतोष नक्षणे कालवश

by Wani Times
May 14, 2026
0
क्राईम

कंटेनर में ठूंसकर मवेशियों की तस्करी का भंडाफोड़

by Wani Times
May 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL