वणी टाईम्स न्युज : दिनांक 30/04/2025
अवैधरित्या रेतीची वाहतूक करत असलेला एक ट्रॅक्टर वणी पोलिसांनी कारवाई करून जप्त केला आहे. या प्रकरणी विवेक वसंता अवधान (40), रा. सावर्ला, ता. वणी याला ताब्यात घेण्यात आले. सदर कार्यवाही बुधवारी पहाटे 3.15 वाजता विठ्ठलवाडी परिसरात करण्यात आली. पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली व 1 ब्रास रेती असे एकूण 3 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पीएसआय सुदाम आसोरे व कॉन्स्टेबल अनिल यांनी केली. या प्रकरणी कलम 303 (2) BNS अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पो. स. फौ. सुरेंद्र टोंगे करीत आहेत.