वणी : आम्हाला डी. फार्म केलेली मुलगी पाहिजे होती, म्हणून नांदवायला नकार देणाऱ्या पती व त्याच्या आई वडिलांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणी तालुक्यातील एका गावात माहेरी असलेल्या विवाहीतेने 8 डिसेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
फिर्यादी विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा लग्न 2021 मध्ये नागपूर येथील प्रशांत प्रभाकर पिंपळकर (33) सोबत सामाजित रीतीरिवाजानुसार झाले होते. तिला एक वर्षाची मुलगी आहे. लग्नानंतर तिचे पती प्रशांत सासरे प्रभाकर पिंपळकर व सासू सुनिता पिंपळकर हे आम्हाला डी. फार्म केलेली मुलगी पाहिजे होती. तू कमी शिकलेली आहे. तू भिकारी घराची आहे, असे म्हणून नेहमी टोमणे मारायचे. तसेच तिचा पती तिला दारू पिऊन मारहाण करायचा.
प्रसूती झाल्यानंतर मी डी.फार्म करते म्हणून तिने पती व सासऱ्याला अनेकदा सांगितले. परंतु जेव्हा पर्यंत तू डी.फार्म पूर्ण करीत नाही तो पर्यंत आम्ही तुला नांदवायला नेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. मुलगी झाल्यानंतरही पती तिला घेऊन गेला नाही. तसेच फिर्यादी महिलेनी सप्टेंबर 2023 मध्ये चंद्रपूर येथे डी.फार्म मध्ये अडमीशनही घेतला. मात्र सासरचे लोकं तिला नांदवायला तयार झाले नाही. त्यामुळे विवाहीतेनी वणी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. पोलीस विभागाच्या भरोसा सेल मार्फत दोघांमध्ये समेट करण्यासाठी तीन वेळा समुपदेशन करण्यात आले.
भरोसा सेलमध्ये समझोता न झाल्यामुळे पिडीत विवाहीतेनी पती प्रशांत प्रभाकर पिंपळकर, सासरे प्रभाकर चंद्रभान पिंपळकर व सासू सुनिता प्रभाकर पिंपळकर सर्व रा. खरबी चौक, साईबाबा नगर नागपूर विरुद्द तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्द कलम 34, 498 (A) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांचे मार्गदर्शनात कॉन्स्टेबल विठ्ठल बुरेवार करीत आहे.