जितेंद्र कोठारी, वणी : आईवडिलांच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य, राहायला मोडकीस आलेली झोपडी, 4 बहिणी आणि 1 लहान भाऊ. त्यात मोलमजुरी करणाऱ्या आईवडिलांनी जेमतेम मोठी बहिणीनंतर तिचाही लग्न केला. लग्नाला दोन वर्ष उलटत नाही तर सासरी भांडण करून तीन महिन्या आधी राहायला माहेरी आली. घरी आई स्वयंपाक करीत असताना शौचास जाऊन येतो म्हणून जंगलात गेली. आणि जंगलात एका लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून तिने आपले जीवन संपविले. समाजमन सुन्न करणारी ही घटना शनिवार दुपारी 12.30 वाजता दरम्यान शहरातील शास्त्रीनगर भागात उघडकीस आली. जयश्री राजू कुळसंगे (20) रा. खरवड, ता. वरोरा, जि. चंद्रपूर असा आत्महत्या करणाऱ्या विवाहित युवतीचा नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार शास्त्रीनगर भागात वास्तव्यास असलेले पुरुषोत्तम परचाके याला 4 मुली आणि 1 मुलगा आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पुरुषोत्तम यांनी मोठ्या मुलीच्या लग्नानंतर 2021 मध्ये जयश्रीचा लग्न वरोरा तालुक्यातील खरवड येथील राजू कुलसंगे सोबत केला. लग्नाच्या दीड वर्षानंतर जयश्री पतीचे घर सोडून राहायला आली. शनिवारी सकाळी तिने घराची साफ सफाई करून पिण्याचे पाणी आणले. मात्र काही वेळाने तिने शौच जाण्याच्या बहाणान्ये गळफास घेतला. जयश्री याला झाडाला गळफास लावतांना तिथे खेळत असलेल्या काही मुलांनी बघितले. त्यांनी आरडाओरड केली असता लोकांनी त्या दिशेने धाव घेतली. मात्र तोपर्यंत जयश्री हिने गळफास घेतले होते.
नागरिकांनी तात्काळ तिच्या गळ्यातून दोरी काढून ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र रुग्णालयात आणताना तिने प्राण सोडले. घटनेबाबत मृतक जयश्रीचे पती राजू कुलसंगे याला सूचना देण्यात आली. जयश्री हिने आत्महत्या का केली ? या मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र जयश्रीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असून वर्गणी गोळा करून अंत्यसंस्कार करण्याची शास्त्री नगर भागातील युवकांची तयारी सुरु असल्याची माहिती आहे. मृतका जयश्री हिच्या मागे आई वडील, 2 अविवाहित बहिण आणि 1 लहान भाऊ आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात ठेवला आहे.