वणी : पोलीस स्टेशन वणी येथील दूरक्षेत्र राजूर (कॉ.) येथे बाजार परिसरात सार्वजनिक ठिकाणी सुरु वरली मटका सेंटरवर एलसीबी पथकाने धाड टाकली. पोलिसांची धाड पडताच मटका जुगार लावणारे 4 ते 5 इसम तिथून पळून गेले. तर वरली मटकाची चिठ्ठ्या फाडणारा इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतला.
ताब्यातील इसमास नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपला नाव मनोज तातोबाजी काटकर (45) रा. राजूर कॉलरी सांगितले. पोलिसांनी सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात रोख 3 हजार 760 रुपये तसेच आकडे लिहिलेली बुक, पेन, कार्बन इत्यादी साहित्य मिळून आला.
फिर्यादी पोलीस हवालदार सुधीर कुंजीप्रसाद पांडे (40) स्था. गुन्हा शाखा यवतमाळ यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी मनोज तातोबाजी काटकर विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.