वणी टाईम्स न्युज : वेकोलि कर्मचाऱ्याचा क्वार्टरमध्ये भरदिवसा धाडसी चोरी झाल्याची घटना सोमवार 3 जानेवारी रोजी सकाळी 9.45 वाजता सुंदरनगर येथे उघडकीस आली. चोरट्याने दरवाज्याचे कडीकुंडा तोडून क्वार्टर मध्ये प्रवेश करून 24 ग्राम सोन्याचे दागिने किमत 58 हजार व रोख 40 हजार असे एकूण 98 हजाराचा मुद्देमाल लंपास केला.
फिर्यादी वेकोलि कर्मचारी गोपाल बाळकृष्ण भुसारी, रा. क्वार्टर नं. MQ 131, सुन्दरनगर यांनी सोमवारी रात्री दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द कलम 305 (a) व 331 (4) BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दोन महिन्यांपूर्वी वणीतील घरात झाली चोरी..!
फिर्यादी गोपाल बाळकृष्ण भुसारी यांचे जिल्हा परिषद कॉलोनी वणी येथेही घर असून त्या घरात त्यांची वृध्द आई कमलबाई भुसारी राहतात. दोन महिन्यापूर्वी 7 डिसेंबर 2024 रोजी रात्री चोट्यानी त्यांच्या आईचे 9 तोळा सोन्याचे दागिने व 45 हजार रुपये रोख , असं 4 लाखाचा मुद्देमाल लंपास केले होते. त्या घटनेतील चोरट्यांचा अद्याप पोलिसांना थांगपत्ता लागला नाही.