वणी टाईम्स न्युज : शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत कुर्ली गावाजवळ दालमिलचे शटर तोडून चोरट्यांनी 4 विद्युत मोटर लंपास केल्याची घटना 20 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. घटनेबाबत फिर्यादी भागीदार अजिंक्य दिलीप कोचेटा, रा. वणी यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
फिर्यादी अजिंक्य कोचेटा आणि राहुल पारखी या दोघांच्या भागीदारीमध्ये कुर्ली गावाजवळ रतन एग्रो इंडस्ट्रीज नावाने दाल मिल आहे. हंगाम नसल्यामुळे जुलै 2024 पासून दालमिल मध्ये उत्पादन बंद आहे. 20 सप्टेंबर रोजी फिर्यादीचे भागीदार राहुल पारखी यांना दालमिल लगत असलेल्या शेत मालकाचा फोन आला की मिलचे शटर उघडे दिसत आहे.
माहितीवरुन दोघांनी दाल मिलमध्ये जाऊन पाहणी केली असता 7.5 Hp ची एक मोटर किंमत 15 हजार आणि 1.5 Hp च्या 3 मोटर किंमत 15 हजार असे 30 हजार किमतीच्या 4 मोटर लावलेल्या ठिकाणहून चोरी गेल्याचे दिसून पडले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातआरोपीविरुद्ध कलम 334(1), 305(a) नुसार गुन्हा दाखल केला.