वणी टाईम्स न्युज : वेकोलीच्या नीलजई कोळसा खाणीत माती उत्खनन करणाऱ्या कंपनीच्या कॅम्प मध्ये घुसून राडा करणाऱ्या शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यासह 20 युवकांवर शिरपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जी.आर.एन. कन्स्ट्रक्शन कंपनी हैद्राबादचे कॅम्प मॅनेजर पुवाडी रामकृष्ण प्रसाद रामानायडू यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आयुष ठाकरे (मुंगोली) व त्याचे 20 साथीदारा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोमवार 30 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता दरम्यान 20 ते 25 लोक चारचाकी वाहनात कंपनीचे निलजई खाणीत कॅम्प मध्ये आले. फिर्यादी यांनी त्यांनी तुम्ही कोण आहे आणि कुठून आले असे विचारले असता त्यातील एकाने मी शिवसेना (उबाठा) लीडर आयुष ठाकरे आहे. तुमच्या कंपनीत किती कामगार काम करतात आणि स्थानिक बेरोजगार युवकांना कंपनीत नोकरी का नाही देत. असे सांगून जोरा जोराने ओरडण्यास सुरु केले.
आयुष ठाकरे आणि सोबत आलेल्या युवकांनी मॅनेजर यांना शिवीगाळ करुन स्थानिकांना कामावर न घेतल्यास कंपनी कसे काम करते आम्ही बघून घेऊ, अशी धमकी दिली. कंपनी आवारात घोषणाबाजी करीत युवकांनी वेकोलिचे सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केली. फिर्यादी यांनी दिलेली तक्रारीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात आरोपी आयुष ठाकरे (मुंगोली) व अनोळखी 19 आरोपी विरुद्ध कलम 352,351(2), 191(2), 190, 189(2), 115(2) BNS 2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.