वणी : राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना गोवंश तस्करी बंद होण्याएवजी वाढतच आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मुकुटबन, झरीजामण, पाटणबोरीमार्गे मोठ्या प्रमाणात तेलंगाना राज्यात गोवंश तस्करीची होत आहे. नुकतेच शुक्रवार 8 फेब्रुवारी रोजी तेलंगाना राज्यात 17 गोवंश जनावरांना निर्दयीपणे दोरीने बांधून पायदळ घेऊन जात असताना एसडीपीओ पथकाने झरीजामणी तालुक्यातील आंबेझरी जंगल शिवारातून तिघांना ताब्यात घेतले. सदर प्रकरणी ताब्यात घेतलेल्या 3 तस्करांसह 6 जणांवर जनावरांचे छळ व महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्याखाली पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मंगेश रामकृष्ण मेश्राम (35), सदाशिव गोविंदा मडावी (47), दोघ रा. माथार्जुन, ता. झरी, प्रवीण शंकर दुधकर (21) रा. सुसरी ता. मारेगाव, शेख नजीर शेख हसन (50) रा. पाटणबोरी, फकीर मो. शेख बशीर (47) रा. मारेगाव, शेख जमीर शेख रहमान (25) रा. पाटणबोरी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून 2 लाख 12 हजार रुपये किमतीचे 17 गोवंश प्रजातीचे जनावर जप्त करून चारापाण्याची व्यवस्थेसाठी गौशालामध्ये दाखल केले आहे.
सदरची कार्यवाही उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात पाटणचे ठाणेदार संदीप पाटील, एसडीपीओ कार्यालयातील पोलीस हवालदार विजय वानखेडे, प्रदीप ठाकरे, अमोल नुन्नेलवार, अतुल पायधन तसेच पाटण ठाण्यातील सुरेश राठोड, रतिश वानखेडे, अमित पोयाम, प्रशांत तलांडे यांनी शुक्रवारी रात्री 9 वाजता दरम्यान पार पाडली.