वणी टाईम्स न्युज : घरासमोर खुर्ची टाकून बसून असताना मोहल्ल्यातील एका इसमाने तुमची खुर्चीवर बसण्याची औकात आहे का ? अस म्हणून जातीवाचक अपशब्दांचा वापर केला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गैरअर्जदार व्यक्ती विरुद्ध अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अट्राॅसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल केला. विशाल बाबाराव खांदनकर (44), राह. इंदिरा चौक वणी असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी संग्राम बाजीराव गेडाम (26), रा. इंदिरा चौक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान तो आपल्या घरासमोर खुर्ची टाकून बसला होता. त्याच वेळी मोहल्ल्यातील विशाल खांदनकर तिथे आला व फिर्यादी यास येथे खुर्ची टाकून बसण्याची तुझी औकात आहे का ? अस म्हणून जातीवाचक अपशब्द वापरले. त्यावेळी शेजारील काही व्यक्ती व महिला तिथे हजर होते. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादी याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गैर अर्जदार विशाल बाबाराव खांदनकर (44), राह. इंदिरा चौक विरुद्ध अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 चे कलम 3 (1)(r) व 3 (1)(s) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 296 अन्वये गुन्हा दाखल केला.