वणी : कायर मुकुटबन मार्गे तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे कत्तलीसाठी गोवंश जनावरांची तस्करी शिरपूर पोलिसांनी उधळून लावली. पोलिसांनी तस्करांच्या तावडीतून 3 गोवंश बैलांची सुटका केली. यावेळी 3 बैल व मालवाहू वाहनासह 5 लाख 67 हजाराचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी अमोल सुधाकर घुगुल रा. नेरड (पुरड) याला पोलिसांनी अटक केली.
वणी येथून कायर मार्गे गोवंश तस्करीची टीप शिरपूरचे ठाणेदार सपोनि संजय राठोड यांना मिळाली होती. माहितीवरून रविवार 21 जाने. रोजी दुपारी सैदाबाद फाट्यावर सापळा रचून वणी कडून येणाऱ्या महिंद्रा बोलेरो मालवाहू वाहन क्रमांक MH 29 BE 6172 ला थांबविले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये 3 गोवंश जनावर निर्दयीपणे आकुड दोरीच्या सहाय्याने डांबून आढळले.
सदर कार्यवाही एपीआय संजय राठोड, अनिल सूरपाम, राजन इसनकर व चालक अभिजित कोषटवार यांनी केली.