वणी टाईम्स न्युज : गावी जाण्यासाठी रात्रि कोणतेही वाहन न मिळाल्याने तो एस.टी. बस स्थानकात जाऊन झोपला. रात्री 1.30 वाजता दरम्यान कुणीतरी त्याच्या पेन्टच्या खिशात हात घातल्याचे जाणवल्याने त्याची झोप उघडली. तेव्हा दोन इसम तिथं उभे दिसले. त्यांनी त्या दोघांना तुम्ही माझ्या मोबाईल चोरी करण्यासाठी खिशात हात घातला का ? असं विचारलं असता त्यापैकी एकाने हातातील काठीने त्याच्या डोक्यावर मारली. तर दुसऱ्या आरोपीने लोखंडी सलाकीने डोक्यावर मारुन जखमी करून दोघं पळून गेले.
फिर्यादी प्रवीण मधुकर काकडे (45), रा. पळसोनी (मुर्धोनी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी भुऱ्या डाखरे (25) रा.पळसोनी (मुर्धोनी) व त्याचे मित्र राहुल (25) विरुध्द कलम 118 (2), 3(5) नुसार गुन्हा दाखल केला.