प्रतिनिधी झरी : झरीजामणी तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका इसमाची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी रात्री 7.30 वाजता दर्म्हण उघडकीस आली. अशोक दयालाल भेदोडकर रा. दुर्भा ता. झरी असे हत्या करण्यात आलेले इसमाचे नाव आहे. फिर्यादी सुखदेव भेदोडकर यांनी दिलेल्या फिर्याद वरून पाटण पोलिसांनी अज्ञात मारेकरी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार अशोक भेदोडकर हा पाटण येथून बाजार करून सायंकाळी गावात परत येत होता. दुर्भा व नवीन दुर्भा या गावाच्या मधात गोटाली नाल्याच्या पुलावर अज्ञात हल्लेखोरांनी गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून अशोकचा खून केला. पाटण पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनसाठी झरी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. पोलिसांनी अज्ञात मारेकरी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार स्वप्नील ठाकरे यांचे मार्गदर्शनात पाटण पोलीस करीत आहे