वणी टाईम्स न्युज : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री 9 वाजता दरम्यान मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांचा मृत्यू झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी खेरवाडी सिग्नलजवळील आमदार झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाकडे जात असताना त्यांच्यावर तीन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
बाबा सिद्दिकी हे गेली तीन ते चार दशकं पासून राजकारणात सक्रिय होते. राजकीय आयुष्यातील बहुतांश काळ ते काँग्रेस पक्षात होते. काही महिन्यांपूर्वीच ते अजित पवारांच्या गटात गेले होते. सलमान खान यांचे बाबा सिद्दीकी यांच्याशी जवळचे संबंध होते. गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.