वणी टाइम्स : आजी आजोबांकडे राहत असलेली अल्पवयीन नात रात्री आजी जवळ झोपली होती. परंतु आजीला झोप लागताच नात घरून बेपत्ता झाली. काही वेळाने आजीची झोप उघडली असता बाजूला झोपलेली नात दिसून आली नाही. आजी आजोबांनी संपूर्ण घर छाणून घेतला, पण नात दिसली नाही. तिच्या मोबाईलवर फोन लावला तर फोन स्विच ऑफ होता. सकाळी शेजाऱ्याच्या मदतीने गावात, मैत्रिणीकडे तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. तरी नात कुठही मिळून आली नाही. शेवटी 60 वर्षीय आजोबांनी 14 एप्रिल रोजी वणी पोलीस स्टेशन गाठून त्यांची अल्पवयीन नात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली.
बेपत्ता मुलगी शहरालगत एका गावात आपल्या आजी आजोबांकडे राहून शहरातील एका शाळेत 9 व्या वर्गात शिक्षण घेत होती. नुकतीच परीक्षा संपल्यामुळे ती घरीच राहायची. दिनांक 13 एप्रिल रोजी आजी आजोबंसोबत जेवणं करून रात्री 10 वाजता मुलगी आजीच्या बाजूला झोपली होती. रात्री 11 वाजता दरम्यान आजीची झोप उघडली असता तिला बाजूला झोपलेली नात दिसून आली नाही. आजीने आपल्या नवऱ्याला उठवून नात घरात नसल्याची माहिती दिली.
दोघांनी घरात व आजुबाजुला शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे आजोबांनी नातच्या मोबाईल नंबरवर कॉल केला. परंतु तिचा मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता. काही तरी अनिष्ट झाल्याच्या आशंकेवरून त्यांनी शेजाऱ्याच्या मदतीने मुलीच्या मैत्रिणी व नातेवाईकांकडे चौकशी केली. परंतु तिथेही त्यांच्या पदरी निराशा पडली. शेवटी मुलीच्या आजोबांनी कथ्या रंगाचा प्लाजो व पांढऱ्या रंगाचा ती शर्ट घातलेले त्यांची 15 वर्ष 7 महिन्याची अल्पवयीन नातला कुणी तरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनमध्ये दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
मुली बेपत्ता होण्यामागे मोबाईलचा हात.. !
हल्ली लहान मोठे सगळ्यांच्या हातात स्मार्ट फोन आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीसोबत मैत्रीचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावरून झालेली मैत्रीमध्ये विविध प्रलोभन देऊन अल्पवयीन मुलींना प्रेम जाळ्यात ओढल्या जाते. क्षणिक आकर्षणाच्या बळी पडून मुली कुटुंबाचा विचार न करता अनोळखी व्यक्ती सोबत पळून जात आहे. मागील काही दिवसात वणी तालुक्यात अशी अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांना अल्पवयीन मुलं मुलींवर लक्ष देणे गरजेचे झाले आहे.