वणी टाईम्स न्युज : उन्हाळा लागताच ठिकठिकाणी आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी नांदेपेरा मार्गावर एका चहा टपरीला आग लागली होती. तर शनिवारी दुपारी 3 वाजता दरम्यान जत्रा मैदान परिसरात भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली. लालगुडा परिसरात रजानगरला लागून या खुल्या जागेवर जमा केलेला भंगार या घटनेत जळून खाक झाला.
आग लागल्याची माहिती मिळताच वणी नगर परिषदेचे अग्निशामक वाहन घटनास्थळी पोहचून आग विजविण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच पोलीस ही घटनास्थळी पोहचले. बातमी लिहेपर्यंत आग सुरू होती तर घटनास्थळी शेकडो लोकांनी गर्दी केली.
पहा व्हिडिओ –