वणी टाईम्स न्युज : प्रगतीनगर येथील रहिवासी सुभाष डोर्लिकर यांचे घरी गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी हल्ला केला. मात्र डोर्लिकर यांच्या मुलीने आरडा ओरड केल्याने 5 ते 6 दरोडेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रेसह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. यवतमाळ येथून डॉग स्कवाड आणि फिंगरप्रिंट एक्स्पर्ट यांना पाचारण करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार डोर्लिकर कुटुंबीय रात्री जेवण करून झोपी गेले होते. मध्यरात्री 2 वाजता दरम्यान 5 ते 6 अज्ञात दरोडेखोरानी मागील दाराने घरात प्रवेश केला. त्यांनी एका खोलीत प्रवेश करून सामान अस्तव्यस्त केले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या खोलीचा दार तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी डोर्लिकर यांच्या मुलीची झोप उडाली आणि तिनं आरडा ओरड केला. त्यामुळे दरोडेखोर तेथून पसार झाले. माहितीनुसार सर्व दरोडेखोर हे चारचाकी वाहनमध्ये आले होते आणि त्यांनी डोक्यावर हेल्मेट घालून होते.
अधिक माहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल –