वणी : दुसऱ्याच्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या तरुणाने तिच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने मारेगाव पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. तक्रारीत नमूद आरोपीच्या नावावरून मारेगाव पोलिसांनी सदर तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिला तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. 25 मार्च रोजी तिची 17 वर्षाची मुलगी तिच्या मावशी सोबत झोपली होती. मात्र सकाळी मुलगी घरात दिसून पडली नाही. मुलीच्या आई वडिलांनी गावात व नातेवाईकाकडे शोध घेतला असता मुलगी कुठेही मिळून आली नाही.
दरम्यान गावातीलच एकाचे घरी रंगपंचमीसाठी पाहुणा म्हणून आलेला साहिल बावणे (21) रा. खिड्डी, ता. गडचांदुर, जि. चंद्रपूर यांनी तिच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे.