वणी टाईम्स न्युज : येथील भीमनगर वस्तीत एका 30 वर्षीय युवकांनी रविवारी रात्री 11 वाजता दरम्यान घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र वणी ग्रामीण रुग्णालयात झालेल्या मृतदेहाच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये युवकाने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. उज्ज्वल चरणदास कांबळे, रा. जगनाडे चौक, स्वातंत्र्य चौक, नागपूर ह.मु. भीमनगर असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
ग्रामीण रुग्णालयातील वैदकिय अधिकारी यांनी अभिप्राय दिला की, मृतक उज्ज्वल याचा शव विच्छेदन अँडव्हान्स रिपोर्ट मध्ये मिळालेल्या निष्कर्षावर मृतकाच्या गळ्यावर लिगेचर मार्क असल्याने त्याचा गळा आवळून व मृतकास कुठल्या तरी हत्याराने किंवा बलप्रयोग करून मारहाण केल्याने आतील उजवे फुफ्फुस आणि यकृत यास ईजा होऊन मृत्यू झाल्याचे नमूद केले. शव विच्छेदन अहवाल नंतर सहायक पोलिस निरीक्षक निलेश अपसुंदे यांनी नोंदविलेल्या फिर्याद वरून वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध उज्ज्वल चरणदास कांबळे याचा खून केल्या प्रकरणी कलम 103(1) BNS अन्वये गुन्हा दाखल केला आहे