जितेंद्र कोठारी, वणी : वणी विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बुधवार 25 सप्टे. रोजी सकाळपासून त्यांचे देशमुखवाडी येथील निवासस्थानी लोकांनी गर्दी केली. शहरातील गणमान्य ते सर्व साधारण नागरिक तसेच वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील हजारो नागरिक व महिलांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना प्रत्यक्ष भेटून पुष्पहार, बुके, शाल, श्रीफळ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना त्यांच्या जन्मदिनी शुभेच्छा देण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, विजय पिदुरकर, रवी बेलुरकर, बंडू चांदेकर, गजानन विधाते, लिशा विधाते, काँग्रेस नेते संजय खाडे, पुरुषोत्तम आवारी, ललित लांजेवार, भाजपचे तालुका पदाधिकारी, व्यापारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व अनेक गणमान्य नागरिक आमदाराच्या निवासस्थानी आले होते. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व शुभचिंतकासाठी आमदार निवास येथे चहापाणी व नाष्ट्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.
यावेळी ग्रामीण भागातील शेकडो महिलांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची लाडका भाऊ म्हणून ओवाळणी करून महिलांना आर्थिक आधार देणारी लाडकी बहीण योजना सूरु करण्यासाठी शासनाचे आभार मानले.
सलग दुसऱ्यांदा वणी विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करणारे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या कार्यकाळात वणी उप विभागातील वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यात करोडो रुपयांची विकास कामे पूर्ण केले. गावागावात पक्के रस्ते, पाणी पुरवठा योजना, समाज भवन, मोक्षधाम व इतर कामासाठी त्यांनी शासनाकडून निधी खेचून आणली. शिवाय मतदारांमध्ये त्यांची प्रतिमा सर्व साधारण जन सेवक आमदाराची असून त्यांनी लोकप्रियतेचा शिखर गाठला आहे.