वणी टाईम्स : मराठी सिने रसिकांच्या खास आग्रहास्तव बहुप्रतिक्षित पारिवारिक विनोदी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’ हा ६ फेब्रुवारी २०२६ पासून वणी शहरातील शानदार दीप्ती स्काय सिनेक्स येथे एकदा पुन्हा प्रदर्शित करण्यात येत आहे.

कुटुंबासोबत आनंद घेता येईल असा हा हलकाफुलका, मनोरंजक चित्रपट फक्त ७ दिवसांसाठी प्रदर्शित राहणार आहे. सून–सासूच्या नात्यातील गंमतीदार प्रसंग, कौटुंबिक मूल्ये आणि खुसखुशीत विनोद यांचा सुरेख संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
वणी व परिसरातील मराठी रसिक प्रेक्षकांनी या मर्यादित कालावधीतील संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दीप्ती स्काय सिनेक्सच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. परिवारासह निखळ मनोरंजनासाठी हा चित्रपट नक्की पाहावा, असेही सांगण्यात आले आहे.

हा चित्रपट बघण्याकरिता Make My Trip किंवा District (By Zometo) या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन तिकीट खरेदी करु शकतात. तसेच ‘दीप्ती स्काय सिनेक्सच्या मोबाईल नंबर 8208339290 वर कॉल करून आपली सीट बुक करता येईल.










