वणी टाईम्स न्युज : सुपरहिट मराठी चित्रपट “सैराट” फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचा नवीन मराठी सिनेमा “आशा” शुक्रवार 19 डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे. शहरातील सुप्रसिद्ध दीप्ती स्काय सिनेक्स मध्ये हा सिनेमा दुपारी 12.10 आणि 3.10 वाजता या दोन शोमध्ये सुरु आहे. तर अक्षय खन्ना यांची सुपरहिट मुव्ही धुरंधर दीप्ती सिनेक्समध्ये सलग तिसऱ्या हप्त्यात हाऊसफुल्ल सुरु आहे. सायंकाळी 5.45 आणि रात्री 9 वाजताच्या शोमध्ये धुरंधर दाखविण्यात येत आहे.

‘बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये” या प्रभावी टॅगलाइनसह प्रदर्शित आशा चित्रपटाने प्रदर्शनाआधीच ६१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळवत समीक्षकांची दाद मिळवली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

‘आशा’मध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आशा सेविकेचा भूमिका साकारत असलेली रिंकू राजगुरू . या व्यक्तिरिक्त या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत

‘आशा’ हा चित्रपट फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाहीये तर घर सांभाळून, घरासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक बाईचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आहे. सतत नवनवीन विषयांना उचलून धरणाऱ्या मराठी प्रेक्षकांना ही वेगळ्या वाटेवरची वेगळी आणि अनोखी गोष्ट निश्चितच आवडेल. आशा सेविकांनी हा चित्रपट नक्की बघावा.










