जितेंद्र कोठारी, वणी : शहराच्या इतिहासात प्रथमच 27 मे 2025 रोजी ब्रायडल कॉम्पिटीशन, सेलिब्रेटी शो व फॅशन अवॉर्ड शो चे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील नांदेपेरा मार्गावरील ब्युटी पार्लर ग्लोरीयस अकॅडमीच्या संचालिका मेकअप आर्टिस्ट प्रणाली अंबागडे तर्फे एस.बी. हॉल वरोरा रोड येथे या भव्य सेलिब्रेटी सेमिनारचे आयोजन करण्यात येत आहे.
स्पर्धा दोन गटामध्ये घेण्यात येणार असून अ गटात 5 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलींना सहभाग घेता येणार आहे. तर ब गटात 15 ते 40 वर्ष वयोगटातील मुली, तरुणी व महिलांना स्पर्धेत भाग घेता येईल. या कार्यक्रमाला प्रख्यात मराठी सिने अभिनेत्री उर्मिला कोठारे ह्या प्रामुख्याने उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विजेत्यांना अवॉर्ड देण्यात येणार आहे. तसेच दोन लाइव्ह मेकअप आर्टिस्ट आशू ग्लॉम मेकर (वर्धा) व समीर जगताप (मुंबई) हे ही उपस्थित राहणार आहे.
दिल्ली, मुंबई सारख्या महानगरात अशा प्रकारचे सेमिनार होत असते. मात्र वणी सारख्या छोट्या शहरात पहिल्यांदाच मेकअप व ब्रायडल कॉम्पिटीशन शो चे आयोजन करण्यात येत आहे. 27 मे रोजी होणाऱ्या या सेलिब्रेटी सेमिनार मध्ये सहभागी होण्यास इच्छुक तरुणी आणि महिलांनी ग्लोरीयस अकॅडमी, नांदेपेरा रोड वणीच्या संचालिका प्रणाली राजकुमार अंबागडे यांच्याशी 9834136820 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पहा व्हिडिओ: