Friday, April 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home अपघात

अपघात : घराचे बांधकाम पाहण्यासाठी पायदळ जात असताना काळाचा घाला

लायन्स शाळेजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

July 5, 2025
in अपघात, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,804

वणी टाईम्स न्युज : बांधकाम सुरु असलेल्या घराकडे पायदळ जात असताना एका अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवार दि. 4 जुलै रात्री 9 वाजता सुमारास वणी शहरातील नांदेपेरा मार्गावरील लायन्स शाळेजवळ घडली. ईश्वर किशन गाडगे (50), रा. साधनकर वाडी, चिखलगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

फिर्यादी तुषार ईश्वर गाडगे (24) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेपेरा रोड गुप्ता ले आऊट येथे त्यांच्या घराचे बांधकाम सुरु असून त्यांचे वडील ईश्वर गाडगे हे नियमितपणे बांधकाम पाहणीसाठी जात असते. गुरुवारी रात्री 8.30 वाजता सुमारास जेवण करून ते पायदळ त्या ठिकाणी जात होते. रात्री 9.10 मिनिटांनी फिर्यादी यांच्या वडिलांच्या मोबाईल वरून एका जणांने फोन करून कळविले की, लायन्स शाळेजवळ त्यांचे वडिलांचा अपघात झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

माहिती मिळताच मुलगा तुषार गाडगे हा तात्काळ ग्रामीण रुग्णालयात पोहोचला. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून ईश्वर गाडगे यांना मृत घोषित केले. कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती व नाक-कानातून रक्तस्राव होत होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी तुषार ईश्वर गाडगे याच्या फिर्यादवरून वणी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालक विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 281, 106(1) सह मोटार वाहन कायदा कलम 134 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महापुरे हे करीत आहेत.

Tags: road accidentwani police
TweetSendShareShare
Previous Post

गुंडगिरी : चायनीज फूड दुकानदारावर चाकूने हल्ला

Next Post

सन्मान: वणीतील कु. देवयानी हिची बायो मेडिकल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

Related Posts

वणी

पारदर्शकतेला बळ: नियोजन सभापतीचे नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध थेट आवाहन

by Wani Times
April 24, 2026
वणी

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

by Wani Times
April 24, 2026
क्राईम

बंद घर से चोरों ने ढाई लाख के गहनों पर किया हाथ साफ

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

मारेगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

जावयानेच चोरला ट्रॅक्टर, सासूने नोंदवली तक्रार

by Wani Times
April 21, 2026
क्राईम

वीज खांब चोरण्याचा प्रयत्न; दाम्पत्य ताब्यात, दोघे फरार

by Wani Times
April 21, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL