वणी टाईम्स न्युज : 21/04/2025
अंधारात लपून बसलेल्या संशयित इसमाला अटक
येथील बस स्थानकाचे मागे असलेले योगीराज नगर येथे बांधकाम चालू असलेल्या एका इमारती जवळ अंधारात लपून बसलेल्या इसमाला पोलिसांनी अटक केली. रमेश लटारी राऊत (37) रा. सिंधी वाढोणा, तह. झरीजामणी असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी हा चोरी किंवा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने आपले अस्तित्व लपवून बसून असल्याची पोलीस कॉन्स्टेबल विकास दलपत ब्राह्मण यांची फिर्याद वरून कलम 122 म.पो.का. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
जुन्या वादातून मित्राला मारहाण
एकेकाळी सोबत मिळून मोलमजुरी करणारे मित्र वैरी झाले. दोन तीन वर्षापूर्वी झालेल्या भांडण्याच्या कारणावरून शिवीगाळ करुन एकाने दुसऱ्याला लाकडी दांड्याने डोक्यावर, पायावर, कंबरेवर मारुन जखमी केले. फिर्यादी जितेंद्र महादेव डहाके (40) रा. नवीन लालगुडा वणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी शंकर किनाके (32), रा. खरबडा मोहल्ला वणी विरुद्ध कलम 118(1), 352, 351(2), 351(3) नुसार गुन्हा दाखल केला.
लहान भाऊ कुठे आहे विचारून मोठ्या भावाला मारहाण
वणी पोलीस स्टेशन अंतर्गत राजूर (कॉलरी) येथील फिर्यादी मोहम्मद आसिफ एनुल हक्क (25) यांनी तक्रार नोंदवली की, शुक्रवार 18 एप्रिल रोजी सायंकाळी ताज बुक डेपो येथे बसून असताना आरोपी मो. कादिर अली झाकीर अली (48), मो. सलीम उर्फ सैफ कादिर अली (23) यांनी तुझा लहान भाऊ कुठे आहे असे विचारून शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. फिर्यादी याचा भाऊ मो. आमीन हा भांडण सोडविण्यासाठी मधात आला असता आरोपी यांनी त्याच्या मानेवर रॉडने हल्ला केला. फिर्याद वरून पोलिसांनी वरील दोन्ही आरोपी विरुद्ध कलम 118(1), 352, 351(2), 351(3) आणि 3(5) BNS अन्वये गुन्हा दाखल केला.