वणी टाईम्स न्युज : प्रियकर अविवाहित तर प्रेयसी लग्न झालेली महिला, तरी त्या दोघांचे मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. अशातच प्रियकराचे लग्न जुळले. त्यामुळे प्रेयसीने त्याच्या सोबत भेटी व बोलणे बंद केले. प्रियकर वारंवार तिला भेटण्यासाठी बोलवायचा. पण ती काही न काही कारण पुढे करुन टाळायची. प्रेमात ब्रेकअप झाल्यामुळे प्रियकर त्याला शिवीगाळही करायचा. तरी तिनं त्याच्या सोबत बोलणे सुरू केले नाही.
शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता प्रियकराने शर्मा चौपाटीवर प्रेयसीचा हात पकडून बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता तिनं विरोध केला. त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी लोकांच्या समोर विवाहित प्रेयसीला शिवीगाळ करुन निघून गेला. शिवीगाळ केल्याने अपमानित 35 वर्षीय महिलेने आरोपी प्रियकराविरुद्ध वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रियकर नाझीम इकबाल खान पठाण (27) रा. रंगनाथ नगर कोंडणवाडी वणी विरुद्ध कलम 74, 352 BNS अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास PSI धनंजय रत्नपारखी करीत आहे.