वणी टाईम्स न्युज : येथील प्रख्यात राज मंडप डेकोरेशन तसेच गणराज केटरर्सचे संचालक अरुण बिलोरिया (58) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. मागील काही दिवसांपासून आजारी अरुण बिलोरिया यांचे नागपूर येथे दवाखान्यात उपचार सुरू होते. दरम्यान सोमवारी रात्री 11 वाजता त्यांची प्रकृती आणखी गंभीर होऊन त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मनमिळाऊ आणि अत्यंत शांत स्वभावाचे अरुण बिलोरिया हे मंडप डेकोरेशन असोसिएशन वणीचे अध्यक्ष होते. त्यांच्या मागे पत्नी, पुत्र शाश्वत बिलोरिया, पुत्री वैष्णवी आणि खूप मोठा बिलोरिया कुटुंब आहे. अरुण बिलोरिया यांची अंत्ययात्रा आज दुपारी 2 वाजता त्यांचे रवीनगर येथील निवास स्थानावरून निघणार आहे.
वणी टाइम्सतर्फे अरुणभाऊ बिलोरिया यांना भावपूर्ण श्रध्दांजली.💐