जितेंद्र कोठारी, वणी : यवतमाळ पोलीस दलात सहायक उपनिरीक्षक पदावर कार्यरत शेखर मारोतराव वांढरे यांची पोलीस उप निरीक्षक पदावर बढती झाली आहे. पोलीस दलात गोपनीय शाखेत कर्तव्यावर शेखर वांढरे हे 1990 पासून पोलीस विभागात सेवा प्रदान करीत आहे. पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाल्याने शेखर वांढरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मारेगाव तालुक्यातील खैरगाव येथील मूळ रहिवासी शेखर वांढरे यांनी पोलीस दलात अनेक ठिकाणी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडले. जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे पथक, गुन्हा शाखा व गोपनीय शाखेत त्यांनी काम केले. शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे सुरक्षा रक्षक म्हणूनही त्यांनी कर्तव्य बजावले. गुन्हा शाखेत कार्यरत असताना शेखर वांढरे यांना पोलीस महासंचालक पदक मिळाले.
शेखर वांढरे यांची पोलीस दलातील कलाकार म्हणून आहे. साहित्यिक व उत्कृष्ट वारली चित्रकला कलाकार म्हणून त्यांनी ख्याती मिळवली आहे. शेखर वांढरे यांच्या प्रयत्नाने पोलीस दलाचे पहिले साहित्य संमेलन मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. पोलीस उप निरीक्षक शेखर वांढरे यांची पदोन्नती बद्दल मित्र परिवार, मॉर्निंग वॉक ग्रुप व देसी कट्टा मित्र मंडळी कडून शुभेच्छा देण्यात येत आहे.