वणी टाईम्स न्युज : काही दिवसांपासून बंद असलेल्या जुन्या घरातून अल्पवयीन मुलांनी जुने वापरते पितळी भांडी चोरुन नेले. चोरट्यांनी घरात लावलेले सीसीटिव्ही कॅमेराची तोडफोड केली. मात्र सीसीटिव्ही फोडण्या अगोदर तिन्ही अल्पवयीन चोरट्यांचे चेहरे कॅमेरात कैद झाले. मकान मालक योगेश मंगलचंद चींडालीया (49) रा. छोरीया ले आऊट यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात 3 अल्पवयीन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचे शहरात जुन्या स्टेट बँक समोर चिंडालिया कॉम्प्लेक्स येथे जुने घर असून कॉम्प्लेक्स मध्येच अगरबत्तीचा व्यवसाय आहे. त्यांनी छोरिया ले आऊट मध्ये नवीन घर बांधले असून सहा महिन्यापूर्वी कुटुंबासह नवीन घरात शिफ्ट झाले. त्यामुळे जुंन घर मागील सहा महिन्यापासून बंद स्थितीत आहे. दिनांक 9 जानेवारी रोजी योगेश चिंडालिया यांनी जुन्या घराकडे फेरफटका मारला असता अंगणातील सीसीटिव्ही कॅमेरा तुटलेलं दिसलं.
काही तरी गडबड असल्याची शंका येऊन त्यांनी पहिल्या मजल्यावर जाऊन पाहिले असता बेडरूम मध्ये ठेवलेला दिवाण उघडा दिसला. त्यांनी पाहणी केली असता दिवाण मध्ये ठेवलेली पितळीची 2 परात, 4 वाट्या, 4 ग्लास आणि 2 गुंड असे एकूण 10 हजाराचे भांडी दिसून आली नाही. योगेश चिंडालिया यांनी घरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता दोन मुलं पहिल्या मजल्यावरून घरात प्रवेश करताना दिसून पडले. सीसीटिव्ही मध्ये कैद झालेल्या चेहऱ्यावरून मुलांबाबत चौकशी केली असता 12 ते 13 वर्ष वयातील तिन्ही मुलांचे नाव उघड झाले.
फिर्यादी यांनी याबाबत 10 जानेवारी रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन चोरट्याविरुद्ध 3 (5), 305 (a), 324 (4), 324(5), 331(3) BNS नुसार गुन्हा दाखल करून तपास सूरु केला आहे.