वणी टाईम्स न्युज : रविवारी वणी येथील माळीपुरा भागात चाकू हल्यात गंभीर जखमी तरुण प्रणय मूने याच्यावर नागपूर मेडिकल कॉलेज मध्ये तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र अद्यापही तो शुद्धीवर आला नसल्याने अती दक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान हल्ला करणारा हिंगणघाट येथील युवक हा रागिष्ट प्रकृतीचा असून क्षुल्लक कारणावरून त्यांनी त्याचे मित्र प्रणय मूनेवर सर्जिकल ब्लेडने वार केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात हल्लेखोर युवक अजिंक्य चौधरी हा एका फायनांस कंपनीत नोकरीवर आहे. नुकतीच त्याची बदली यवतमाळ येथून वणीला झाली. वणी येथे भाड्याची खोली पाहण्याकरिता आरोपी हा रविवारी एका अल्पवयीन मुलासह हिंगणघाट येथून वणीत आला. माळीपुरा भागात वास्तव्यास प्रणय मुकुंद मूने हा अजिंक्यच्या ओळखीचा होता. त्यामुळे अजिंक्य आणि त्याच्या सोबत आलेला अल्पवयीन मित्र हा प्रणयाला भेटायला त्याच्या घरी गेले होते. प्रणयच्या घराचा अंगणात बोलत असताना काही कारणावरून दोघांचा वाद झाला. आणि रागाच्या भरात अजिंक्यने धारदार सर्जीकल ब्लेडने प्रणायचा गळा चिरला. असे बयान आरोपीने पोलिसांना दिले आहे.
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड
प्रणय मुने या तरुणावर प्राणघातक हल्ला करणारा आरोपी अजिंक्य संतोष चौधरी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. सात आठ वर्षांपूर्वी त्यांनी क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या कार्यालयात जाऊन फर्निचर तोडफोड आणि ठाणेदाराच्या आंगावर धावून गेल्याचा केस आरोपीवर दाखल आहे.
हल्यामागे लव्ह ट्राईंगलचा संशय
तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यामागे प्रेम प्रकरणाच्या दिशेनेही पोलीस तपास करीत आहे. आरोपी अजिंक्य चौधरी याचे वणीत वास्तव्यास एका मुलीसोबत प्रेम संबंध असल्याचे बोलले जाते. प्रेयसीच्या एका मित्राला अजिंक्यने 25 हजार रुपये हात उसणे दिले होते. मात्र त्यांनी पैसे परत केले नाही. त्यामुळे आरोपी अजिंक्य आणि प्रेयसी मध्ये भांडण झालं. अजिंक्यने प्रेयसी आणि तिच्या मित्राला जीवे मारण्याची धमकीही दिली. तेव्हा प्रेयसीने वणी पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार केली होती. दरम्यान प्रेयसीचा तो मित्र कोण ? हल्यामागे प्रेम त्रिकोणाचे काही संबंध नाही ? या दिशेनेही पोलीस तपास करीत आहे. मात्र हल्यात जखमी तरुणाच्या बयानावर पोलिसांची तपास अवलंबून आहे.
संबंधित बातमी –