वणी टाईम्स न्युज : येथील माळीपुरा भागात घरात घुसून एका तरुणाचा गळा चिरल्याची घटना आज सकाळी 9 वाजता दरम्यान घडली. प्रणय मुकुंद मूने (24) असे या हल्ल्यात गंभीर जखमी तरुणाचा नाव आहे. वणी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जखमी तरुणाला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. तर सदर प्रकरणी हिंगणघाट येथील एका अल्पवयीन सह दोघांना संशयाच्या आधारावर ताब्यात घेण्यात आले आहे. तरुणावर हल्ला करण्याचा मागे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.