वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील शिंदोला येथे एका मोबाईल शॉपीला आग लागल्याने लाखोंचा साहित्य जळून भस्मसात झाला. शनिवार 23 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची चर्चा आहे. या अग्निकांडात मिलिंद मोबाईल शॉप मधील अंदाजे 15 लाख रुपयांचा साहित्य जळाल्याची माहिती आहे.
माहितीनुसार परमडोह येथील मिलिंद ढवस यांचे शिंदोला कळमना मार्गावर मिलिंद मोबाईल शॉप नावाने मोबाईल विक्री व दुरुस्तीची दुकान आहे. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गावाला गेले. रात्री उशिरा किंवा पहाटे दरम्यान दुकानात आग लागली. सकाळी आग लागल्याची घटना उघडकीस येताच नागरिकांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत दुकानातील मोबाईल, फर्निचर, इन्व्हर्टर, टिव्ही, लॅपटॉप व दुकानातील इतर साहित्य संपूर्णपणे जळून भस्मसात झाला.आगजनीच्या घटनेबाबत फिर्यादी मिलिंद ढवस यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. दुकानात नेमकी आग कशामुळे लागली. याबाबत स्पष्ट झाले नाही.