वणी टाईम्स न्युज : राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत मागील अनेक दिवसांपासून सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांची तारीख बाबत केंद्रीय निवडणूक आयोग आज पत्रकार परिषदेत घोषणा करणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषदचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत आयोग महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये विधानसभा निवडणुकांची तारखा आणि वेळापत्रक जाहीर करणार आहे. निवडणूका जाहीर झाल्या बरोबर राज्यात आचार सहींता लागू होणार आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगाने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठका सुरू होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे अनेक महत्वाचे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. अशातच राज्यात आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भाजपची लगेचच पहिली यादी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी देखील समोर येणार असल्याचे बोललं जात आहे.