सुशील ओझा, झरी : कॉलेजला आज पेपर आहे, असं सांगून घरून निघालेली अल्पवयीन मुलगी सायंकाळी उशिरा पर्यंत घरी आलीच नाही. आईने गावात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता मुलगी मिळून आली नाही. शेवटी मुलीच्या आईने मुकुटबन पोलीस ठाण्यात तिची अल्पवयीन मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार नोंदविली.
फिर्यादी महिला मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात दोन मुली एक मुलांसह राहते. महिलेची 16 वर्षाची लहान मुलगी मुकुटबन येथील एका महाविद्यालयात 11 वी मध्ये शिक्षण घेत आहे. शनिवार 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आज पेपर आहे म्हणून कॉलेजला जातो असे आईला सांगून घराबाहेर पडली. मात्र सायंकाळी उशिरा पर्यंत मुलगी परत आली नाही. फिर्यादी आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 137(2) बी एन एस नुसार गुन्हा दाखल केला.