वणी टाईम्स न्युज : वणी येथून रुईची गाठी घेऊन मुंबईकडे निघालेला कंटेनर ट्रक मार्डी गावाजवळ टर्निंगवर पलटी झाला. मार्डी ते वडकी मार्गावर एका वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून भरधाव ट्रक रस्त्यावर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात ट्रक चालक आणि कंडक्टर यांना किरकोळ मार लागला.
प्राप्त माहितीनुसार वणी येथील एका जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीतुन रुईची बेल भरून कंटेनर ट्रक क्रमांक MH 23 AU 3891 हा शनिवारी सकाळी खैरी, वडकी मार्गे मुंबईच्या दिशेने निघाला होता. दरम्यान मार्डी येथून थोडं पुढे वळणावर वळण घेत असताना ट्रक पलटी झाला. यात ट्रकवर ठेवलेलं कंटेनर ट्रक पासून वेगळा होऊन पडला. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले.