वणी : तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच दिवशी दोघांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. बाबापूर येथे एका व्यक्तीने कीटकनाशक प्राशन करून तर डोर्ली गावात तरुणाने गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली. प्रशांत निब्रड (45) रा. बाबापूर व निखील टोंगे (30) रा. डोर्ली असे आत्महत्या करणाऱ्या दोघांचे नाव आहे.
मृतक बाबापूर येथील प्रशांत अण्णाजी निब्रड यांनी 22 नोव्हे. रोजी आपल्या शेतात कीटकनाशक प्राशन केले. तर डोर्ली येथील मृतक निखील विठ्ठल टोंगे (30) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. शिरपूर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा व पोस्टमार्टम नंतर मृतदेह कुटुंबियांचे स्वाधीन केले आहे. दोघांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले. याबाबत शिरपूर पोलीस अधिक तपास करीत आहे.
तालुक्यात आत्महत्येच्या घटनेत दिवसोंदिवस वाढ होत आहे. कर्जाचा बोजा, आर्थिक तंगी, नैराश्य आणि दारूचे व्यसन यामागे प्रमुख कारण असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.