वणी : येथील मोक्षधाम सेवा समिती व्यवस्थापक मंडळाची पुढील 5 वर्षासाठी अविरोध निवड शनिवार 27 एप्रिल रोजी करण्यात आली. मोक्षधाम सभागृहात आयोजित सभेत मुन्नालाल तुगनायत यांना वर्ष 2024 ते 2029 या कालावधी करिता समितीचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
समितीचे उपाध्यक्ष म्हणून सतीश पिंपळे व दिलीप खाडे, कार्याध्यक्ष पदावर सुरेश खिंवसरा यांची अविरोध नियुक्ती करण्यात आली. तसेच सचिव पदावर विलास पारखी, सह सचिव म्हणून करण पटेल, सोमनाथ मदान, कोषाध्यक्षपदी राहुल लाल यांची अविरोध निवड झाली. कार्यकारिणी सदस्य पांडूरंग लांजेवार, नंदकिशोर खत्री, चंदर फेरवाणी, रविन्द्र निखार, चंद्रकांत जोबनपूत्रा, गिरजाशंकर जोशी, महादेव बिलोरीया, अर्जुनदास आसवाणी, अशोक बतरा, सुरेश बन्सोड, सुरेश गटलेवार, दिलीप बिसमोरे, सुरज निकुरे यांचा समावेश आहे. या सभेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंगेश कदम यांनी काम पाहिले.
वणी येथे 2004 पासून कार्यरत मोक्षधाम सेवा समिती मार्फत मोक्षधाम परिसराचे सौंदर्यीकरण, पेयजल, नागरिकांना बसण्याची व्यवस्था, सभागृह आदी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नगर परिषद वणी, आमदार, खासदार व जन सहयोगाने सेवा समिती तर्फे अनेक उपक्रम राबविले जाते. यापुढे ही मोक्षधाम परिसराचा विकास व इतर उपक्रम राबविण्याचा मानस नविन व्यवस्थापक मंडळाने व्यक्त केला आहे.