जितेंद्र कोठारी, वणी : चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा क्षेत्रासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाला अवघ्या एक आठवडा बाकी असून उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या क्षेत्रातून महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शनिवार 13 एप्रिल रोजी वणीत येणार आहे. येथील शासकीय मैदान (पाण्याची टाकी जवळ) सायंकाळी 6 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे.
सभेसाठी देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने येणार होते. मात्र हवामान खराब असल्यामुळे ते नागपूर येथून सडक मार्गाने वणी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, चंद्रपूर आर्णी लोकसभा विस्तारक रवी बेलुरकर सह जिल्ह्यातील आमदार, भाजप नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणारआहे.