• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, May 29, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट ?

📌 “हफ्तेखाऊ धोरणामुळे” मटका-झेंडीमुंडीला अभय; ग्रामस्थांचा संताप

Wani Times by Wani Times
May 26, 2026
in गावाकडच्या बातम्या, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 705

सुशील ओझा, झरी: औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे आणि झरी-जामणी तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या मुकुटबन परिसरात अवैध धंद्यांनी अक्षरशः डोके वर काढल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मुकुटबन पोलिस स्टेशनच्या हद्दीत मटका, झेंडीमुंडी, अवैध दारू विक्री, गुटखा तस्करी, गांजा विक्री, जनावरांची तस्करी तसेच चोरीच्या रेतीची वाहतूक खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मुकुटबन येथे सध्या तीन मटका काउंटर आणि तीन झेंडीमुंडी काउंटर सुरू असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. या ठिकाणी वारंवार भांडणे, हाणामाऱ्या आणि गोंधळाचे प्रकार घडत असून गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

स्थानिक नागरिकांनी आरोप केला की, काही अवैध व्यावसायिकांना पोलिसांचे “आशीर्वाद” मिळत असल्यामुळे हे धंदे निर्भयपणे सुरू आहेत. विशेषतः बीट जमादार आणि ठाणेदार यांच्यावर “हफ्तेखाऊ धोरण” राबवत अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवीन बीट जमादार नियुक्त झाल्यापासून परिसरातील अवैध धंद्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचेही बोलले जात आहे.

मुकुटबनसह अडेगाव, गणेशपूर, कोसारा, डोंगरगाव, बोपापूर, सुरला, खडकडोह, निमणी, सोनेगाव, खातेरा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असल्याचा आरोप आहे. तर मुकुटबन आणि घोंसा परिसरात मटका व झेंडीमुंडी खुलेआम सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याशिवाय, वणी आणि कोरपणा परिसरातील काही व्यक्तींमार्फत बंदी असलेल्या सुगंधी गुटख्याची तस्करी होत असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. तेलंगणा सीमेलगतच्या भागातून जनावरांची तस्करी तसेच मुकुटबन परिसरात गांजा विक्री वाढल्याने अल्पवयीन मुले आणि युवक व्यसनाधीन होत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, चोरी, मारामाऱ्या आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्याऐवजी पोलिसांचे लक्ष अवैध धंद्यांवर “वसुली” करण्याकडे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वणी येथील एलसीबी पथकावरही निष्क्रियतेचे आरोप होत असून, “एलसीबी आजपर्यंत एकही ठोस कारवाई करताना दिसली नाही,” अशी टीका नागरिकांनी केली.

या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित बीट जमादाराला तात्काळ निलंबित करावे तसेच संबंधित ठाणेदाराची बदली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, एका राजकीय पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात निवेदन देत परिसरातील अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे.

Tags: illigal businessLead storymukutban police
TweetSendShareShare
Previous Post

लॉयन्स के मेधावी विद्यार्थियों एवं पालकों का सम्मान

Next Post

लोककलावंत डॉ. दिलीप अलोने शुक्रवारी सह्याद्री वाहिनीवर

Related Posts

अपघात

हिवरा शेतशिवारात वीज कोसळून बैलजोडी ठार

by Wani Times
May 29, 2026
0
क्राईम

उच्च शिक्षित महिला बनी दहेज प्रताड़ना की शिकार

by Wani Times
May 28, 2026
0
क्राईम

उड़ता पंजाब की राह पर वणी ? गर्द के नशे में डूबती जा रही युवा पीढ़ी

by Wani Times
May 28, 2026
0
अपघात

⚡बिजली गिरने से खेतिहर महिला की मौत

by Wani Times
May 27, 2026
0
वणी

लोककलावंत डॉ. दिलीप अलोने शुक्रवारी सह्याद्री वाहिनीवर

by Wani Times
May 27, 2026
0
वणी

लॉयन्स के मेधावी विद्यार्थियों एवं पालकों का सम्मान

by Wani Times
May 26, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL