वणी टाईम्स न्युज : सत्ताधारी पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी लाडकी बहिण योजना सूरु करून महिला मतदारांचे मत मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र वणी विधानसभा क्षेत्रात आपल्या बहिणीकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता बहिणींची रक्षा करण्यास सदैव तत्पर म्हणून एकमेव लाडका भाऊ म्हणून राजू उंबरकर यांचे नाव घेतले जाते. दरवर्षी रक्षाबंधनच्या दिवशी हजारो महिला, भगिनी राजू उंबरकर यांना राखी बांधून ओवाळणी करतात.
यावर्षीही येथील वसंत जिनिंग हॉलमध्ये आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात तालुक्यातील शेकडो महिलांनी आपले लाडके भाऊ राजू उंबरकर आणि लाडकी वहिनी तृप्ती उंबरकर यांना ओवाळून राख्या बांधल्या. यावेळी राजू उंबरकर यांनी सांगितले की रक्षाबंधनाचा हा सण फक्त भाऊ बहिणीचे प्रेमाचा प्रतीकच नव्हे तर समाजात महिलांचा सन्मान आणि त्यांच्या प्रती आदर्श दर्शविणारा एक अनोखा दिवस आहे.
सर्व समाजातील महिला, भगिनी माझ्यासाठी आदरणीय आहे. महिलांचा आशीर्वाद आणि पाठिंबा नेहमी माझ्या कार्यासाठी महत्त्वाचा राहिला आहे. त्यांच्या सहकार्यामुळे मला नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळतो. निवडणूक आणि मतांचे राजकारणासाठी मी भाऊ- बहिणीचे नाते जोपासत नाही.
राजू उंबरकर – नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना