वणी : ऐन हिवाळयात अचानक वातावरणातील बदल होऊन सोमवार सकाळ पासून तालुक्यात पावसाची झडी लागली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे रबी हंगामाला चांगलाच फटका बसला आहे. कापूस आणि तुर पिकांना या पावसामुळे आतोनात नुकसान झाले आहे.
खरीप पिकांना पुर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला अद्याप विमा कंपन्या कडून शेतकऱ्यांना मिळालं नाही. विमा रक्कम मिळविण्यासाठी शेतकरी विमा कंपनीच्या कार्यालयाला चकरा मारत आहे. शेतकऱ्याचे सोयाबीन पीक निघून बाजारात विक्रीसाठी आला आहे मात्र कापूस व तूर पीक अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडले आहे.
अवकाळी पावासामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिके वाया गेली. नुकसान झालेल्या भागात येऊन पिकांचे पंचनामे तातडीने करावे. अशी मागणी बळीराजा करत आहे. झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी देखील शेतकरी करत आहे.