वणी टाईम्स न्युज : महिला शिक्षित, तर देश विकसित या भावनेने देशात महिला शिक्षणाचा रोपटा रोवणाऱ्या पहिली महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती गुरुवारी मॅक्रून स्टुडंट्स अकॅडमी मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई यांच्या फोटोला दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 2 ऱ्या वर्गाची विद्यार्थीनी प्रांजली प्रवीण देठे हिने सावित्रीबाईंचा हुबेहूब पेहराव करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी शिक्षिका विद्या स्वप्नील पाटील हिने सावित्रीबाई फुले यांनी समाजातील स्त्री शिक्षणासाठी तसेच अज्ञान व अंधश्रध्दा नष्ट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण म्हणून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या शाळेचा मुख्याध्यापिका शोभना मॅडम यांनी आपले अध्यक्षीय भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी समस्त विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर उपस्थिती होते.