वणी टाईम्स न्युज : देशातील पहिल्या महिला शिक्षिका व समाज सुधारक क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची उद्या 3 जानेवारी रोजी 194 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. यानिमित्ताने वणी येथील माळी समाज संघटनातर्फे सावित्रीबाई फुले जयंती उत्सव – 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. टागोर चौक येथे श्री विठ्ठल रुख्मिणी भावसार समाज मंदिर येथे आयोजित जयंती निमित्त विविध स्पर्धा, सत्कार समारंभ व अतिथीचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 9 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पाककला, वेशभूषा व एक मिनिट स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता स्वागत समारोह तसेच पाहुण्याचे मनोगत होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या छायाताई सोनुले राहणार आहे.
माळी समाज संघटना महिला अध्यक्ष रिंकू मोहुर्ले उद्घाटक म्हणून तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पं. स वणीच्या माजी सभापती लिशा गजानन विधाते लाभणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून रामदेव बाबा मुक बधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरोज भंडारी, वाहतूक नियंत्रण शाखा प्रभारी सहा.पो. नि. सीता वाघमारे, चंद्रपूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका संगीता पेटकुले उपस्थित राहणार आहेत. यावेळी वणी येथील कु. श्रुती पिसाराम वाढई हीचे सत्कार करण्यात येईल. सायंकाळी 7 वाजता बक्षीस वितरण व स्वरूचीभोज सह कार्यक्रमाची सांगता होईल. सावित्रीबाई फुले जयंती उत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन माळी समाज संघटनेतर्फे करण्यात आले आहे.