वणी टाईम्स न्युज :छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. येथील संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमींच्या वतीने वणी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुरुवारी निवेदन देण्यात आले.
इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना कोणी पकडून दिले, असा वस्तुनिष्ठ इतिहास समोर आणण्याचा दावा केला होता. यावर प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांना मध्यरात्री फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. इतकेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल सुद्धा अपशब्द वापरले होते. त्यानंतर प्रशांत कोरटकर यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप इंद्रजीत सावंत यांनी समाज माध्यमांवर टाकली होती.
प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाईची मागणीचे निवेदन देताना अजय धोबे, जयसिंग गोहोकर, देवराव धांडे, विनोद मोहितकर, प्रवीण खानझोडे, अंबादास वाघदरकर, नामदेव जेणेकर, भाऊसाहेब आसुटकर, ॲड.अमोल टोंगे, ॲड. आकाश निखाडे, आशिष रिंगोले, दत्ता डोहे, सुरेंद्र घागे, कृष्णदेव विधाते, नारायण गोडे, बालाजी काकडे, मारोती जिवतोडे, विनोद बोबडे, देवेंद्र ताजने, सूर्यभान पिदूरकर, रामदास पखाले, अनंत मोहितकर, अरुण डवरे, नरेश मुरस्कर व इत्यादी शिवप्रेमी उपस्थित होते.