वणी टाईम्स न्युज : सामाजिक समता, न्याय, बंधुता आणि ऐक्याचा महामंत्र देणारे महान समाजसुधारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आज महापरिनिर्वाण दिवस. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आंबेडकर चौक स्थित बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्रिवार वंदन केले.
समाजातील अस्पृश्यांना दिली जाणारी हीन वागणूक बाबासाहेबांनी जवळून पाहिली. या अन्यायकारक वागणुक विरोधात लढा देत वंचित घटकांच्या न्याय आणि हक्कांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले.यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह माजी जिल्हा महामंत्री रवि बेलूरकर यांनीही बाबासाहेबाना अभिवादन केले.