वणी : येथील सुप्रसिद्ध वकील निलेश चौधरी व आर्किटेक्ट मनीष चौधरी यांचे वडील महादेवराव चौधरी (77) यांचे गुरुवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचाराकरिता हैद्राबाद येथे जाण्याची तयारी सुरू असताना त्यांनी राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार 2 फेब्रू. रोजी सकाळी 11 वाजता त्यांचे रविनगर येथील निवास स्थानाहून मोक्षधामसाठी निघणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, मनीष व निलेश दोन मुलं, मुलगी, नातू, नात आणि आप्त कुटुंब आहे.