वणी टाईम्स न्युज : ब्राह्मण सभा वणी व बहुभाषिक ब्राह्मण सभेच्या वतीने लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल देशमुख वाडी येथील सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या अमृत योजने बद्दल मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विनोद देशपांडे डोंबिवली व देवदत्त पंडित यांनी सवऀ उपस्थिताना अमृत योजने बाबत सविस्तर समजावून सांगितले. योजने अंतर्गत असलेल्या सर्व आर्थिक विकास योजना, शैक्षणिक कर्ज, औद्योगिक विकास व कौशल्य, स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकास याबद्दल माहिती दिली. तसेच अमृत योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचीही माहिती दिली.
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक व युवती इत्यादींचा विकास घडवण्यासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (Academy of Maharashtra Research, upliftment and Tarining) (Amrut) या नावाने स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली आहे. या मार्गदर्शन शिबिराला ब्राह्मण समाजातील युवक व महिला बहुसंख्येने उपस्थित होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव सुधीर दामले हे होते. प्रास्ताविक ब्राह्मण सभा अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर व संचालन अमित उपाध्ये यांनी केले. तर ब्राह्मण सभाचे सचिव अरुण कावडकर यांनी आभार मानले.