जितेंद्र कोठारी, वणी : जर आपण रोजगाराच्या शोधात आहे आणि नोकरीची आवश्यकता आहे तर आता चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रविवार 3 डिसेंबर रोजी वणी येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्य आणि देशातील तब्बल 70 कंपन्या कडून मुलाखत घेण्यात येणार आहे. योग्यता आणि शिक्षणाच्या आधारावर करिअर निर्माण करण्याचा हा गोल्डन चान्स वणी विधानसभा क्षेत्रातील युवक युवतींना मिळाला आहे.
येथील एस पी एम हायस्कूलच्या पटांगणात रविवारी सकाळी 8 वाजता पासुन सुरु होणाऱ्या या महामेळाव्यात इंटरव्यूहनंतर थेट नियुक्ती पत्र दिले जाणार आहे. रोजगार मेळाव्यात मेकेनिकल, इलेक्ट्रॉनिक, फ़ूड, केमिकलसह सिक्योरिटी गार्ड अणि इतर कंपन्या सहभागी होणार आहे. रोजगार मेळाव्यासाठी मागील दोन महिन्यापासून जय्यत तयारी सुरु आहे. गरजू आणि इच्छुक युवांकडून अर्ज मागविण्यात आले होते. विशेष म्हणजे जे उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहिले आहे, त्यांच्यासाठी मेळाव्या स्थळवर अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या कोळसा खाणी आणि मुकुटबन येथे एमपी बिर्ला कंपनीचे सिमेंट प्रकल्पसह जिनिंग, क्रशर प्लांट उद्योग आहे. मात्र सदर उद्योगांमध्ये स्थानिकपेक्षा बाहेर राज्यातील कामगारांचा भरणा केल्याने स्थानिक तरुण बेरोजगारीची झळ सोसत आहे. बेरोजगारीची भयंकर समस्या लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांचे संकल्पनेतून या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांना प्राधान्य
रविवारी वणी येथे आयोजित मनसे रोजगार मेळाव्यात वणी विधासभा क्षेत्रातील बेरोजगार युवक युवतींना नोकरीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. यापुढे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन राजू उंबरकर यांनी केले आहे.