वणी टाईम्स न्युज : काल शुक्रवारचा दिवस वणीकरांसाठी काळा शुक्रवार (Black Friday) निघाला. वादळी वाऱ्यामुळे सायंकाळी 5.30 वाजता बंद पडलेली विद्युत सप्लाय रात्री 3 वाजता सुरु झाली. त्यामुळे अख्या शहरातील हजारो नागरिकांनी उकाडा व डासांचा त्रास सोसत रात्र जागली केली. शेवटी रात्री 3 वाजता दरम्यान लाईन येताच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
शुक्रवार 18 एप्रिल रोजी दिवस भर कडक उन्ह तापून सायंकाळी 5.30 वाजता दरम्यान वादळी वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळले तसेच काही ठिकाणी टीनपत्राचे शेड हवेत उडून गेले. विद्युत तारांवर झाडे पडल्यामुळे अनेक ठिकाणी खांब वाकले व तारा तुटून गेली. वादळी वारा थांबल्यानंतर विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरु करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू केले. मात्र अनेक ठिकाणी पडलेले मोठे झाडं हटवण्यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. शेवटी 3 वाजता दरम्यान विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास त्यांना यश मिळाला.
मागील काही वर्षांपासून लोडशेडिंगचा प्रकार बंद झाल्यामुळे नागरिकांना अंधारात राहण्याची सवयी राहिली नाही. हवाधुंद किंवा पाण्यापावसात एकाद्या वेळी लाईन गेली तरी 2-3 तासांत परत वीज पुरवठा सुरू होतो. अनेक घरात इन्व्हर्टरची सुविधा आहे. मात्र 4 ते 5 तासानंतर इन्व्हर्टरच्या बॅटऱ्याही डाउन झाल्या. त्यामुळे 18 एप्रिलचा शुक्रवार शहरातील नागरिकांसाठी काळा शुक्रवार ठरला.